राष्ट्रीय चारित्र्य विकासाला प्राधान्य देऊन राष्ट्र विकास
प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी जात किंवा पंथाचा विचार न करता एक चांगले वैयक्तिक चारित्र्य विकसित
राष्ट्रीय चारित्र्य विकासाला प्राधान्य देऊन राष्ट्र विकास


प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी जात किंवा पंथाचा विचार न करता एक चांगले वैयक्तिक चारित्र्य विकसित करावे असे वाटते. जेव्हा मी वैयक्तिक चारित्र्य म्हणतो, तेव्हा माझा अर्थ असा होतो की एकनिष्ठता, सचोटी, ध्येय वचनबद्धता, सामाजिक प्रबोधन आणि इतर अनेक आवश्यक गुणधर्म विकसित करणे. मात्र, आपल्या महान संस्कृतीकडे दुर्लक्ष झाल्याने आणि मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पालकांचा आणि समाजाचा विश्वास त्या प्रमाणात निर्माण झालेला नाही. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या प्रगती करण्यासाठी, समाजातील आणि देशातील प्रत्येक घटकाने वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकसित केले पाहिजे.

राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे नेमके काय?

एका विशिष्ट राष्ट्राचे नागरिक म्हणून आपली ओळख असल्याने आणि जेव्हा राष्ट्र सर्व बाजूंनी सामर्थ्यवान असतो तेव्हा आपल्याला सुरक्षित वाटते, आपण समाज आणि निसर्गाचे ऋणी असतो कारण आपल्याला या स्त्रोतांपासून आपल्या जीवनमानाचा आनंद घेणे शक्य होते आणि जीवनाश्यक सर्व काही साध्य होते. समाज आपले वैयक्तिक परिमाण विकसित करून नव्या पिढीला विकसित करत असतो. परिणामी, मूल जेव्हा वैयक्तिक चारित्र्य विकसित करत असतात, तेव्हा राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे पालक, शिक्षक आणि समाजाची जबाबदारी असते.

जे देश राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासावर लक्ष देत नाहीत, ते कालांतराने आपली महान संस्कृती, अस्मिता आणि राष्ट्र गमावून बसतात. इराण देश हे याचे उत्तम उदाहरण आहे. दुर्दैवाने, मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या अंमलबजावणीमुळे आणि आपल्या शत्रूंनी आणि देशविरोधी प्रवृत्तीनीं आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या ज्या मार्गाने शक्य होईल त्या मार्गाने नाश केल्यामुळे आपण दिवसेंदिवस एक महान भारतीय राष्ट्र म्हणून मागे पडत आहोत.

200 हून अधिक वेळा आक्रमण होऊनही आणि मुघल आणि ब्रिटीशांनी राज्य करूनही, गुरुकुल शिक्षण पद्धतीद्वारे आणि महान ऋषीमुनींनी विकसित केलेल्या विविध पद्धतींद्वारे वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकसित करण्याच्या आपल्या मजबूत पायामुळे आपण एक राष्ट्र म्हणून टिकून आहोत.

राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावामुळे अनेक देशांनी आपली महान संस्कृती आणि ओळख गमावली आहे. अत्यंत कमी कालावधीत, मॅसेडोनियन राजा अलेक्झांडर द ग्रेटने पूर्व भूमध्य, इजिप्त, मध्य पूर्व आणि आशियाचे काही भाग जिंकले. त्याच्या साम्राज्याने त्याने जिंकलेल्या प्रदेशांमध्ये महत्त्वपूर्ण सांस्कृतिक बदल घडवून आणले, त्या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृती बदलून टाकली. संपूर्ण जग जिंकण्याचा त्यांचा प्रवास भारतात आल्यावर थांबला; एका ऋषीशी आध्यात्मिक संबंध आणि भारतीयांच्या लढाऊ कौशल्यामुळे अलेक्झांडरची मानसिकता बदलली. अलेक्झांडर विरुद्ध भारताच्या लढ्याने चीन, जपान आणि या प्रदेशातील इतर अनेक देशांना त्यांचा बचाव करण्यास मदत झाली आहे.

आमचे तरुण पद्धतशीरपणे आमच्या मुळांपासून आणि महान संस्कृतीपासून वेगळे होत चालले आहेत. त्यांच्यामध्ये स्वार्थ, लोभ, चुकीच्या गोष्टींचा ध्यास आणि संकुचित वृत्ती निर्माण करणे हे शत्रुंचे ध्येय आहे. त्यामुळे अनेक तरुण समाजविघातक, पर्यावरण विरोधी आणि देशद्रोही कृत्यांमध्ये गुंतले आहेत तसेच आपल्या महान देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्यासाठी अपप्रचार सुद्धा केला जात आहे. त्यामुळे, आवश्यक सुधारणांना खीळ बसली आहे, आर्थिक वाढ चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी आहे, सुरक्षितता धोक्यात आहे, धार्मिक धर्मांतरे वाढत आहेत, अंमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे, मानसिक आणि शारीरिक अधोगतीमुळे नैराश्य आले आहे आणि आत्महत्येची प्रवृत्ती वाढत आहे, आत्मविश्वास कमी होत आहे आणि त्यामुळे लढण्याची भावना विकसित होत नाहीये.

अनेक विदेशी संस्था तसेच काही भारतीयांना स्वार्थी कारणांसाठी भारत कमकुवत करायचा आहे. ते देशाविरुद्ध आघाडी उघडण्यासाठी, राष्ट्राविरुद्ध एक छुपा खेळ आणि विखारी कथन मांडण्यासाठी आणि अफाट भारताच्या प्रत्येक भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या महान सुधारणांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी नवनवीन कल्पना शोधतात. प्रचंड विदेशी निधी, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आणि चुकीचा इतिहास शेवटच्या माणसापर्यंत पद्धतशीरपणे प्रसार करणे हे ध्येय आहे, त्यासाठी भारतातील सर्वात मोठा धर्म तोडण्यासाठी आणि धर्मांतरित करण्यात, शत्रूंना मदत करण्यासाठी काही कृती केल्या जात आहेत.

वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य कसे विकसित करता येईल?

देश पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा पल्ला गाठत असताना आणि संपूर्ण जग अनेक आघाड्यांवर, समस्यांवर उपाय आपल्याकडे शोधत असताना; चीन, पाकिस्तान आणि आता तालिबान यांच्याकडून अनेक आव्हाने असूनही, वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही अध्यात्मिक संस्थांनी बनवलेले विविध अभ्यासक्रम/कोर्सेस एकात्मिक करून अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचा आहे. आपल्या तरुणांचा एकात्मिक चारित्र्याने विकास करण्यासाठी सरकारने एकात्मिक (व्यक्तिगत व राष्ट्रीय चारित्र्य) अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विविध संस्थांची मदत घ्यावी.

ज्यांना हे नको आहे, ते बहुधा धर्मनिरपेक्षता आणि गलिच्छ राजकारणाच्या नावाखाली विरोध करतील. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, सामाजिक आणि अध्यात्मिक संस्था या सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या देशाला नवीन सामाजिक आणि आर्थिक क्षितिजावर नेत असताना गांभीर्याने विचार करण्याची आणि आपल्या राष्ट्राचे आणि महान संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी कार्य करण्याची वेळ आली आहे.

पंकज जगन्नाथ जयस्वाल

लेखक, वक्ता, इलेक्ट्रिकल इंजिनिअर

7875212161

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande