नागपुरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
- मुलांच्या 31 तर मुलींच्या 12 संघांचा सहभाग नागपूर, 30 नोव्हेंबर (हिं.स.) : नागपूर जिल्हा क्रीडा अध
संग्रहित


- मुलांच्या 31 तर मुलींच्या 12 संघांचा सहभाग

नागपूर, 30 नोव्हेंबर (हिं.स.) : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स अंतर्गत 18 वर्षाखालील मुले व मुलींचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 2 व 3 डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर येथे करण्यात आले आहे. निवड चाचणीचे आयोजन 3 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये मुलांचे 31 संघ तर मुलींच्या 12 संघांनी सहभाग नोंदविला आहे.

सहभागी होणारा खेळाडू 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. खेळाडूकडे आधार कार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र या पैकी किमान दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. खेळाडू हा नागपूर जिल्ह्यातील रहीवासी असावा. कोविड प्रादुर्भाव बघता सर्व खेळाडूंनी मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक यांनी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. भाग्य पत्रिकेमध्ये दिलेली वेळ लक्षात घेवून 30 मिनीआपूर्वी मैदानावर उपस्थिती द्यावी. सर्व संघांनी क्रीडा गणवेश करणे अनिवार्य आहे. याची संघांनी तसेच निवड चाचणी करीता येणाऱ्या खेळाडूंनी नोंद घ्यावी.

विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी विजयी संघ तसेच निवड चाचणी मधून 5 खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. विभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 4 डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande