'जय भीम' चित्रपटाचा खरा एजेंडा निराळाच
गेल्या काही दिवसांपासून जय भीम या तामिळ चित्रपटाच्या बाबतीत खूप उलट-सुलट चर्चा सुरू आहे. प्रामुख्यान
'जय भीम' चित्रपटाचा खरा एजेंडा निराळाच


गेल्या काही दिवसांपासून जय भीम या तामिळ चित्रपटाच्या बाबतीत खूप उलट-सुलट चर्चा सुरू आहे. प्रामुख्याने समाज माध्यमांवर हा विषय प्रचंड चघळला जातोय. त्याचबरोबर हा चित्रपट वास्तवातील घटनेवर आधारित असून आदिवासींवरील अन्यायाला वाचा फोडणारा आहे असे प्रतिपादन या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी केला आहे. हा दावा कितपत खरा आहे याचा शोध टीकाकारांनी घेतला आहे. ‘जय भीम’ चित्रपटाचा चित्रपटाचा विचार करतांना सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की, सिनेमाचं नाव "जय भीम" असं असलं तरी त्याचा दिवंगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. त्यांचं नाव उघडपणे राजकीय उद्दिष्टाकरिता वापरण्यात आले आहे.सिनेमाचा केंद्रबिंदू, अनुसूचित जातीच्या न्यायाच्या संघर्षाशी संबंधित आहे, ज्याच्या एका सदस्याला चोरीच्या आरोपाखाली पोलीस अटक करतात आणि तुरुंगात त्याच्याशी अतिशय क्रूरपणे वागतात. सर्व अडचणींचा सामना करत एक कम्युनिस्ट वकील त्याची केस लढतो आणि जिंकतो अशी ही कथा आहे. चित्रपट एका वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित असल्याचा दावा सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक ह्यांनी केला आहे, परंतु टीकाकारांच्या मते, घटनेला जाणीवपूर्वक दुसरा ‘रंग दे बसंती’ बनवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला दिसून येतो. या माध्यमातून चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक जो अजेंडा राबवू इच्छितात, त्याला अनुरूप व्यक्तींची आणि समाजाची ओळख बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणवतो.

खालील काही बाबी टीकाकारांच्या संशयाला दुजोरा देतात:

1 मूळ घटनेतील कुरावा जमातीच्या जागी सिनेमात पीडित जमात म्हणून इरुला जमात दाखवण्यात आली आहे.

2 सिनेमात गुन्हा करणारा पोलीस अधिकारी वणियार समाजाचा दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्ष घटनेत गुन्हा करणारा पोलीस अधिकारी अँथोनी सामी नावाचा धर्मान्तरित ख्रिश्चन होता.

3 सिनेमात गुन्हा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव 'गुरुमूर्थी' असं दिलं आहे, जे वणियार समाजाच्या प्रभावी आणि आक्रमक अश्या 'कडू वेत्ति गुरु' ह्या नेत्या वरून घेतलं असल्याचं टीकाकारांच्या मते स्पष्ट जाणवत.

4 या गुरुमूर्थी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या मागे वणियार जातीच्या फेडरेशनचे कॅलेंडर स्पष्ट दिसते.

5 सिनेमात गुरुमूर्थीला त्याच्या जातीचा, म्हणजे वणियार समाजाचा पाठिंबा असल्याचं दर्शवले आहे, तसेच या विरोधात कम्युनिस्टांनी लोक चळवळ उभारल्याचे दाखवण्यात आले आहे.

6 पीडितांच्या बाजूची हिंदू नावे बदलण्यात आली आहेत, तर गुन्हेगारांच्या बाजूची हिंदू नावे बदलण्यात आलेली नाहीत.

इरुला जमातीबाबतचे वास्तव आहे. इरुला जमात जी पीडित असल्याची दाखवले आहे, कट्टर हिंदू धर्मीय आहे. तिचे अन्य जमातींशी जवळचे संबंध आहेत. ते सप्त-मातृका, रंगास्वामी आणि शिवाची पूजा करतात. त्यांनी कांडलेले तांदूळ, अलागाडूच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये शिवाला अर्पण केल्या जातात. परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर आणि गिरण्यांच्या शोधानंतर ही परंपरा खंडित झाली आणि ब्रिटिशांनी इरुला जमातीला "अपराधी जमात" म्हणून घोषित करण्यात आले.

स्वतंत्र भारतात इरुला जमातीच्या अधिकारांकरिता लढा देणाऱ्यांत कामराज, राजाजी आणि पसुमपण थेवर ह्यांचा समावेश होतो. केंद्र सरकारने 2016 मध्ये इरुला जमात असल्याचे घोषित केले. त्यापूर्वी 1980 साली मध्ये दिवंगत एम.जी. रामचंद्रन यांनी नारीकुरावास यांना अनुसूचित जमात म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला होता. त्यानंतर 2013 मध्ये काँग्रेस ला, आदिवासी जमातींनी छेडलेल्या आंदोलनाच्या परिणामी एक बिल आणावे लागले, परंतु काँग्रेस ते बिल पारित करवून घेऊ शकली नाही. अंततः मोदी सरकारने तीन महत्वाच्या, पण उपेक्षित आदिवासी समुदायांची,ज्यात इरुला जमातीचा समावेश होता, दीर्घकालीन मागणी पूर्ण केली. परंतु, जय भीम ह्या सिनेमाचं उद्दिष्ट सवर्ण हिंदूंची उदासीनता आणि आदिवासी समुदायांच्या बाबतीतील गैरवर्तन अधोरेखित करणे हे असल्याने, सिनेमात सरकारी मशिनरीच्या द्वारे केला जाणारा भेदभाव झाकण्याकरिता, सवर्ण हिंदूंवर दोषारोप करण्यात आले आहेत, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. कुर्वासच्या जागी सिनेमात इरुला जमात दाखण्यामागचे कारण सिनेमाच्या शेवटाला जेंव्हा क्रेडिट लिस्ट दाखवली जाते, तेंव्हा कॅथलिक चर्च ऐवजी ख्रिश्चन मिशनरीजना धन्यवाद दिले आहेत. असा आरोप केल्या जातो की हे मिशनरी इरुला जमातीलधर्मांतरित करण्यात पुढे आहेत. रोमन कॅथलिक प्रिस्ट एन्ड ब्रदर्सची ही शाखा, 1849 मध्ये एन्टोनी क्लॅनेट याने स्थापित केली. असे म्हंटले जाते की, ते केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनां सारख्या योजनांचा फायदा हे ख्रिश्चन मिशनरी इरुला सारख्या जमातींना मिळवून देतात. परंतु हे सर्व मिशनऱ्यांच्या हातून अंमलात आणले जाते.

जय भीम आणि रंग दे बसंती

टीकाकारांच्या मते जय भीम हा तामिळ सिनेमा, 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या रंग दे बसंती ह्या कम्युनिस्ट विचाराचा प्रचार करणाऱ्या हिंदी सिनेमाच्या समतुल्य आहे. दोन्ही सिनेमांमागची भूमिका एकच आहे, आणि ती म्हणजे, भारतीय शासनाचे अस्तित्व बेकायदेशीर आहे, ज्याविरुद्ध, समानतेचा स्वर्ग आणणारे कम्युनिस्ट शासन येईपर्यंत लढा देणे आवश्यक आहे. जिथे रंग दे बसंती मध्ये कम्युनिस्टांच्या आवर्ती थीम चा उपयोग केला आहे, तिथे जय भीम हा चित्रपट निर्लज्जपणे केवळ कम्युनिझमचाच नव्हे तर, कम्युनिस्ट पक्ष, पक्षाचे झेंडे, पक्षाचं साहित्य आणि नेत्यांचा प्रचार करतो. असाही आरोप केल्या जातो की खऱ्या घटनेवर चित्रपट बनवतांना निर्मात्यांनी जरा जास्तीच स्वातंत्र्य घेतले आहे, आणि हिंदूंना, मुख्यत्वेकरून, वणियार आणि ब्राह्मणांना टार्गेट केले आहे. सत्य परिस्थिती जाणून घेण्याकरिता, टीकाकारांच्या मते इतिहासात डोकावणे आवश्यक आहे. हे त्यांच्या मते, हिंदू राजांच्या काळात या अनुसूचित जमातींना कश्या प्रकारची वागणूक मिळत होती हे समजण्याकरिता आवश्यक आहे. असं निदर्शनास येतं की, हिंदू राजांच्या काळात जमातींना प्रतिष्ठेची वागणूक मिळत होती आणि त्या समाज जीवनाचा एक महत्वाचा घटक होत्या. त्यांच्या दुर्देवी अवस्थेची सुरुवात मुस्लिम आक्रमकांच्या आणि त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या जबरदस्तीने वसुली करण्याच्या धोरणाने झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात केंद्रात काँग्रेस आणि तामिळ नाडू मध्ये, द्रविडीयन राज्यकर्त्यांच्या काळात ह्या जमातींची अवस्था दयनीय झाल्याचं टीकाकारांच निरीक्षण आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक, गनव्हेल यांनी जाणीवपूर्वक ब्राह्मण वकील निवडल्याचा आरोप केल्या जातो. दिग्दर्शकाने जरी वकिलाची जात स्पष्टपणे दर्शवली नसली, तरी, त्याचं चित्र, एक कपाळावर विभूती फासलेला, हरणारा आणि संधीसाधू असं रंगवून, सुरियाच्या दुर्भावनापूर्ण शेऱ्यांकरिता निर्धारित विषय म्हणून त्याचं चित्रण केलं आहे, अशी टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर, त्याच्या, एका दुसऱ्या ब्राह्मणाबरोबर, एडव्होकेट जनरल राममोहन बरोबर असलेल्या, शांत आणि मूक बंधनावर कटाक्ष केला आहे.

चित्रपट काढण्या मागचा राजकीय अजेंडा

जय भीम सिनेमातील सुरुवातीचे दृश्य पुढील उद्वेगजनक राजकारणाची रुजुवात करते. ह्या दृश्यात जेलचा एक अधिकारी सुटका झालेल्या कैद्यांची जातीनिहाय हजेरी घेतांना दाखवला आहे. तसेच कैद्यांच्या जातींची सापेक्ष शक्ती पाहून त्यांची सुटका केल्याचं दाखवलं आहे. त्याचबरोबर शक्तिहीन जातींमधील आदिवासींना पोलीस शिपाई बाजूला घेऊन, आपलं टार्गेट पूर्ण करण्याकरिता, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करतात असं दाखवण्यात आलं आहे. जय भीम ह्या सिनेमाची मध्यवर्ती थीम पोलीस यंत्रणेबरोबरची अथक लढाई आहे. हि कम्युनिस्टांची एक स्टंडर्ड मेथड असल्याचं मानलं जातं. जिथे जिथे पूर्वीच्या लोकशाही देशांत कम्युनिस्ट विजयी झाले, तिथे तिथे पहिला बळी, पोलीस यंत्रणा झाली आहे. जय भीम ह्या चित्रपटात पोलिसांचं चित्रण फक्त भ्रष्टाचारी, क्रूर आणि जातीयवादी असंच केलेलं नाही, तर ते आपली गैरकृत्ये लपवण्यात अयोग्य असल्याचं करण्यात आलं आहे. ह्या चित्रणाला एकमेव अपवाद, आयजीपीचे चरित्र रंगवणारे प्रकाशराज ह्यांचा दाखवला आहे, जे प्रत्यक्षात कम्युनिस्ट असल्याचं म्हटलं जात. टीकाकारांच्या मते, ते कम्युनिस्ट असल्याने त्यांचा अपवाद केला आहे असं दिसतं.

जाती जातींमध्ये फूट पाडण्याचा आरोप

इरुला जमातीमधील एका कुटुंबावर झालेल्या अन्यायाचं निमित्त करून जय भीम हा चित्रपट तीन गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो असं म्हटल्या जातं: १. प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवणे की, इरुला जमातीचे लोक हिंदू रूढी आणि परंपरा पाळत असले, तरी इरुला ही केवळ एक आदिवासी जमात आहे; २. हिंदू धर्मातील इतर सदस्यांनी, जे हिंदू रूढी आणि परंपरा पाळतात, इरुला जमातींना सतत दबावाखाली ठेवलेलं आहे; ३. इरुला आणि इतर आदिवासी जमातींची मुक्ती, फक्त सुरियासारखे लोक आणि कम्युनिस्ट पक्षच करू शकेल. टीकाकारांच्या मते, हे सर्व बघता, असं निश्चितपणे म्हणता येतं की, जय भीम ह्या चित्रपटाद्वारे, निर्माता आणि दिग्दर्शक जातीजातीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कम्युनिस्टांचे पुनरुज्जीवन हाच खरा अजेंडा

चित्रपटात सेंगेनी या इरुला जमातीच्या गरीब महिलेला सुरियाची , जो मार्क्स आणि पेरियार ह्यांचा भक्त आहे, भेट घेण्याकरिता तिच्या खेड्यातील कम्युनिस्टांची मदत घ्यावी लागते असे दाखवण्यात आले आहे.चित्रपटात कम्युनिस्टांचं चित्रण, विविध महत्वाच्या दृश्यांत गौरवशाली क्रुसेडर्स असं केलेलं आहे. टीकाकारांच्या मते,ही कम्युनिझमची अजून एक आवर्ती थीम आहे, जी त्यांच्या पेटंटेड राजकारणाशी सुसंगत आहे. टीकाकारांच्या मतानुसार, जय भीम हा चित्रपट, एका प्रत्यक्ष घडलेल्या घटनेला ट्विस्ट करून, कम्युनिस्ट आणि द्रविडियन विचारधारेतील वाईट तत्वांचा प्रचार करतो. हे इथे लक्षणीय आहे की तामिळ नाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या चित्रपटाची तोंड भरून स्तुती केली आहे. टीकाकारांच्या मते ही घटना ह्या चित्रपटाच्या खऱ्या उद्दिष्टावर प्रकाश टाकते. टीकाकारांच्या मतानुसार, जय भीम ह्या चित्रपटाचा शेवट एका कुरूप वास्तवावर प्रकाश टाकते. आणि ते वास्तव म्हणजे, आदिवासींची मुक्ती केवळ सुरिया म्हणजे चित्रपटातील चंद्रुच्या मार्गाने जाण्यानेच, म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गाने जाण्यानेच होऊ शकेल. टीकाकारांच्या मतानुसार, सध्या अश्या चित्रपटांचे, विशेषतः तामिळमध्ये, पीक आले आहे, जे निर्लज्जपणे भारतीय शासनाला मध्यवर्ती खलनायक दर्शवतात. हा कम्युनिस्ट विचार धारेकडे इशारा आहे हे त्यामुळे निश्चित आहे.

डॉ. प्रशांत देशपांडे

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande