लिओनेल मेस्सी सातव्यांदा बॅलड डीओर पुरस्काराचा मानकरी
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर, (हिं.स.) : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सातव्यांदा बॅलड डी
लिओनेल मेस्सी सातव्यांदा बॅलड डीओर पुरस्काराचा मानकरी


नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर, (हिं.स.) : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सातव्यांदा बॅलड डीओर पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे. फ्रान्समधील फुटबॉल मासिक बॅलन डीओरकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला या पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार मेस्सीला मिळाला आहे. या आधीही मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ मध्ये ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार जिंकला आहे.

मेस्सीने अंतिम फेरीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिक क्लबचा स्ट्रायकर रॉबर्ड लेवानडॉस्की यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. मेस्सीनंतर रोनाल्डो हा सर्वाधिक वेळा बॅलन डीओर पुरस्कार मिळवणारा फुटबॉलपटू असून त्याने २००८, २०१३, २०१४, २०१६, २०१७ मध्ये पुरस्कार पटकावला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande