Custom Heading

चंद्रपूर: जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश
चंद्रपूर १ डिसेंबर (हिं. स.): जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून
चंद्रपूर: जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश


चंद्रपूर १ डिसेंबर (हिं. स.): जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशा सर्व गावे, वस्ती व रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्यात यावी, यासाठी अशा प्रकारची जातीवाचक नावे ओळखून संबंधित नावे बदलण्यासाठी यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर,जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. एल. दुधे, पोलीस निरीक्षक राजू मेढे, नगर प्रशासन अधिकारी अजित कुमार डोके, विधी अधिकारी अनिल तानले, न.प. बल्लारपूरच्या कार्यालय अधीक्षक संगीता उमरे प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित यंत्रणांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही गाव, वस्ती व रस्ते आदींना जातीवाचक नाव नाही अशी नावे कार्यालयाला पाठवावीत. असे सांगून वरखेडकर म्हणाल्या की , तहसीलदार,नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जातीवाचक नावांची माहिती द्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातील आयडेंटिफाय झालेली यादी व नावे तसेच त्या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवावे. व समाज कल्याण विभागाला सहकार्य करावे.

यावेळी विद्युत वरखेडकर यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा घेतला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande