पर्यटनावरील वायू प्रदूषणाच्या परिणामाचा अभ्यास नाही - केंद्रीय पर्यटन मंत्री
खा. बाळू धानोरकर यांच्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर चंद्रपूर / नवी दिल्ली, १ डिसेंबर (हिं.स.) : प्रदूषण
पर्यटनावरील वायू प्रदूषणाच्या परिणामाचा अभ्यास नाही - केंद्रीय पर्यटन मंत्री


खा. बाळू धानोरकर यांच्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर

चंद्रपूर / नवी दिल्ली, १ डिसेंबर (हिं.स.) : प्रदूषणामुळे पर्यटकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत की नाही याचा पर्यटनावर वायू प्रदूषणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने कोणताही औपचारिक अभ्यास केलेला नाही. असे उत्तर पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत दिले.

काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी सरकारने वायू प्रदूषणाच्या पर्यटनावर होणाऱ्या परिणामाचे काही मूल्यांकन केले आहे का, प्रदुषणामुळे पर्यटकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे का असा प्रश्न उपस्थित केला केला होता.वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या भागात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांची माहिती जी. किशन रेड्डी यांनी सविस्तर सांगितली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande