सिरीवेन्नला सीताराम शास्त्री यांच्या निधनामुळे दु:ख : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, 1 डिसेंबर (हिं.स) तेलुगू चित्रपट गीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिरीवेन्नला सीतार
सिरीवेन्नला सीताराम शास्त्री 


नवी दिल्ली, 1 डिसेंबर (हिं.स)

तेलुगू चित्रपट गीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिरीवेन्नला सीताराम शास्त्री यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला.

ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " प्रसिद्ध गीतकार सिरीवेन्नला सीताराम शास्त्री यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांची काव्यात्मक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व त्यांच्या अनेक गाण्यांमधून दिसून येते. त्यांनी तेलुगू भाषा लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या दुःखात सहभागी.ओम शांती."

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande