Custom Heading

राज्यस्तरीय सायकलिंग निवड चाचणीत सई अंबेची वर्णी
औरंगाबाद, १४ सप्टेंबर (हिं.स.) : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नि
सई अंबे


औरंगाबाद, १४ सप्टेंबर (हिं.स.) : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत औरंगाबादच्या साई अंबे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. या स्पर्धेत साई औरंगाबादचा पहिला खेळाडू ठरला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग येथे रविवारी ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत साईने दुसरा क्रमांक पटकावला. पुण्यातील दोन खेळाडूंची निवड पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी झाली.

या स्पर्धेत १६ वर्षाखालील वयोगटात १४ किलोमीटर टाइम ट्रायल सायकलिंग स्पर्धेत साईची निवड झाली. हे अंतर त्याने २१ मिनिटे २७ सेकंदात पार पाडले आणि स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या वीरेंद्र पाटील याने २१ मिनिट १३ सेकंदात प्रथम क्रमांक मिळवला. पुण्याच्या आदिप वाघ याने २१ मिनिट २८ सेकंदात हे अंतर पार करत तृतीय स्थान मिळवले. या वयोगटासाठी आणखी एक निवड चाचणी होईल. त्यानंतर या वयोगटातील एकूण सहा खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघासाठी केली जाईल, असे साईचे प्रशिक्षक व वडील भिकन अंबे यांनी सांगितले. या निवड चाचणीत बाजी मारल्यानंतर साई २६ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.

भिकन आंबे यांनी सांगितले की, साई हा शहरातील भास्कराचार्य प्रतिष्ठान चाटे स्कूलमध्ये दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. साई सायकलिंगसाठी दररोज ५० किमीचा सराव करतो. आठवड्यातून दोन वेळा सायकलपटूंसोबत वेरुळपर्यंत जातात. तसेच डोंगरावर सायकलिंगचा सराव करण्यासाठी सातारा डोंगरावरही जातात. सहा वर्षाचा असल्यापासून साईने स्केटिंगला सुरुवात केली. स्केटिंगमुळे त्याचे स्नायू बळकट झाले. आता महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा साईची आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande