Custom Heading

अभिनेत्री विजयालक्ष्मी कोरोनाग्रस्त
बंगलोर, 15 सप्टेंबर (हिं.स) गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक आणि आरोग्य विषयक विविध समस्यांशी सामना कर
अभिनेत्री विजयालक्ष्मी कोरोनाग्रस्त


बंगलोर, 15 सप्टेंबर (हिं.स) गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक आणि आरोग्य विषयक विविध समस्यांशी सामना करीत असलेल्या बहुभाषी अभिनेत्री विजयालक्ष्मी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

याविषयी फेसबुकद्वारे माहिती देतांना विजयालक्ष्मी म्हणाल्या, " प्रिय चाहते- हितचिंतक मला कोरोना संसर्ग झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप आणि आरोग्य विषयक समस्यांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. चाचणीचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. तब्बेतीसाठी खूप संघर्ष करीत आहे. अनेक लोक आतापर्यंत मदत करीत आले आहेत. तरीही माझे सहकारी, चाहते- हितचिंतक... माझ्यासाठी प्रार्थना करा. "

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विजयालक्ष्मी यांच्या मोठ्या भगिनी उषा यांच्यावर बंगलोर स्थित एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उषा यांना अर्धांगवायू- पक्षघात सदृश आजार झाला असून एप्रिल महिन्यात चेन्नईत झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ही आरोग्य विषयक समस्या समोर आल्याचे यापूर्वीच विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande