Custom Heading

भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचे तालिबान्यांकडून अपहरण
काबुल, 15 सप्टेंबर (हिं.स.) अफगाणिस्तानमधील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचे तालिबान्यांकडून बंदुकी

काबुल, 15 सप्टेंबर (हिं.स.) अफगाणिस्तानमधील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचे तालिबान्यांकडून बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. बंस्रीलाल अरेन्डेह असे या नागरिकाचे नाव असून परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंस्रीलाल हे औषध उत्पादनांचे व्यापारी आहेत. बंस्रीलाल यांचे काबूलमधील त्यांच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले. अपहरणवेळी ते आपल्या दुकानात काम करत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारीही होते. दुकानातील सर्वांचेच अपहरण करण्यात आले होते. मात्र त्यांचे कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी झाले. बंस्रीलाल यांचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहेत. सध्या बंस्रीलाल यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande