गुजरात : नव्या 24 मंत्र्यांचा शपथविधी
- एकूण 10 कॅबिनेट 14 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ गांधीनगर , 16 सप्टेंबर (हिं.स.) : गुजरातचे मुख्यम
गुजरातचे नवे मंत्रिमंडळ


- एकूण 10 कॅबिनेट 14 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

गांधीनगर , 16 सप्टेंबर (हिं.स.) : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी झाल्यानंतर आज, गुरुवारी 24 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 10 कॅबिनेट आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विजय रूपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.

या शपथविधी समारंभानंतर नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळाची गांधीनगर येथे बैठक घेण्यात आली. यासोबतच निमा आचार्य यांची विधानसभा स्पीकरपदी नियुक्ती झाली आहे. तर राजेंद्र त्रिवेदी यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील 22 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे.

कॅबिनेट मंत्री :- राजेंद्र त्रिवेदी , जीतू वाघाणी, ऋषिकेश पटेल, राघव जी पटेल , पूर्णेश मोदी, किरीट सिंह राणा, प्रदीप परमार, अर्जुन चौहान, कनुभाई देसाई, नरेश पटेल

स्वतंत्र प्रभार :- हर्ष संघवी, जगदीश पंचाल, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील

राज्यमंत्री :- मुकेश पटेल, निमिषा सुथार, अरविंद रैय्यानी, कुबेर डिंडोर, कीर्ति सिंह वाघेला, गजेंद्र परमार, राघव मकवाणा, विनोद मोरडिया, देवा मालम

सदर शपथविधी सोहळा बुधवारी दुपारी होणार होता. मात्र नव्या मंत्रिमंडळाबाबत रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज होता. त्यामुळे बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं सुरु होती. त्यानंतर हायकमांडने नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी रुपाणी यांच्यावर सोडली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande