Custom Heading

आमदार अनिल भोसलेंसह सात जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
पुणे 16 सप्टेंबर (हिं.स) शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकर
आमदार अनिल भोसलेंसह सात जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल


पुणे 16 सप्टेंबर (हिं.स)

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आमदार अनिल भोसले यांच्यासह सातजणांविरुद्ध पोलिसांनी पुरवणी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले.भोसले यांच्याबरोबरच मंगलदास विठ्ठल बांदल, बँकेचे संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, हितेंद्र विराभाई पटेल आणि मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जदार व गुंतणूकदारांची ४९६ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिवाजीनगर न्यायालयात त्याबाबतच्या ७३८० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र बुधवारी दाखल करण्यात आले. सायबर क्राईम व आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, तपास अधिकारी सतीश वाळके व त्यांच्या पथकाने हा तपास पूर्ण केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande