Custom Heading

चंद्रपूर : पं.स.चे ग्रामीण गृहनिर्माणचे कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
चंद्रपूर 16 सप्टेंबर (हिं.स.) - जिल्ह्यातील जिवती पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माणचे कंत्राटी अभिय
चंद्रपूर : पं.स.चे ग्रामीण गृहनिर्माणचे कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात


चंद्रपूर 16 सप्टेंबर (हिं.स.) - जिल्ह्यातील जिवती पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माणचे कंत्राटी अभियंता आशिष शिंदे यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

तक्रारदार हे जिवती तालुक्यातील घोडाअर्जुनी येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांचे वडील व आजोबा यांच्या नावाने असलेल्या घराच्या बांधकांकरिता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दोन टप्य्यात २ लाख ९६ हजार रुपये मंजूर झाले होते. तिसऱ्या टप्य्यात ९० हजार रुपये मिळण्याकरिता जिवती पंचायत समितीत तिसऱ्या टप्य्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी कंत्राटी अभियंता आशिष शिंदे यांनी २ हजारांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी केल्यावर गुरुवारी पडताळणी दरम्यान ग्रामीण गृहनिर्माणचे कंत्राटी अभियंता आशिष शिंदे यांना रक्कम घेताना लाच घेताना रंगेहात पकडले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande