नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये पुन्हा टाळेबंदी
बीजिंग, 16 सप्टेंबर (हिं.स.) : कोविडच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आता नव्या व्हेरिएंटमुळे
नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये पुन्हा टाळेबंदी


बीजिंग, 16 सप्टेंबर (हिं.स.) : कोविडच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आता नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये पुन्हा कडक टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिक संसर्गजन्य व्हेरिएंटबद्दल नागरिकांमध्ये चिंतेंचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्व किनारपट्टीवरील शहरांमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने या भागात कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे.

फुजियान प्रांतातील पुतियन शहरामधील टोल नाक्यांवर तपासणी सुरू करण्यात आली आहे.तसेच कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या प्रमाणामुळे पुतियन शहराच्या जवळच्या झियामेन आणि क्वानझोऊ शहरांतील नागरिकांना प्रवास प्रतिबंधित केला आहे. दरम्यान फुजियानच्या विविध भागांमध्ये आणखी ५० रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी बहुतेक पुतियन प्रदेशातील आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande