Custom Heading

''मिस्टर इंडिया'' मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई, १६ सप्टेंबर, (हिं.स.) : ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’चा किताब पटकवणारा प्रस
mr India manoj patil


मुंबई, १६ सप्टेंबर, (हिं.स.) : ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’चा किताब पटकवणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी गोळ्या खाऊन मनोजने आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मनोजला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खानच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप मनोजच्या कुटुंबीयांनी केला आहे.

साहिल विरोधात याआधीही मनोजने पोलिसात तक्रार केली आहे. साहिल माझं करिअर संपवण्याची धमकी देतो. तसेच तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी अपप्रचार करत असल्याचा आरोपही मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande