Custom Heading

जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी, ममता, पूनावाला
तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनीचाही समावेश नवी दिल्ली, १६ सप्टेंबर (हिं.स.) : 'टाइम' साप्ताहि
modi mamta poonawala 


तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनीचाही समावेश

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर (हिं.स.) : 'टाइम' साप्ताहिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनीचेही नाव आहे. बुधवारी ही यादी जाहीर करण्यात आली.

टाइमने म्हटले आहे की, भारताला तीन नेत्यांनी दिशा दिली. त्यात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. नेहरू व गांधी यांच्यानंतर भारतीय राजकारणावर इतका प्रभाव कुणी पाडला नव्हता.

'टाइम'ने या संदर्भात म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही तर त्या म्हणजेच पक्ष आहेत. रस्त्यावरची लढाई लढण्याची जिद्द व स्वकष्टाने मिळवलेले यश हे पुरुषी संस्कृतीला आव्हान देत उजळले आहे.

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याविषयी म्हटले आहे की, ४० वर्षीय पूनावाला हे जगातील सर्वांत मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करीत असून त्यांनी अत्यंत योग्य वेळी जगाला मदत केली. कोरोनाची साथ संपलेली नाही, पण ती संपवण्यात पूनावाला नक्की मदत करतील. लस असमानता गंभीर असून जगातील काही देशांकडे जास्त लस आहे, तर काही देशात लशीचा तुटवडा आहे.

या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी व मेघन तसेच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बरादर टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियातील विरोधी नेते अलेक्झी नवाल्नी, संगीतकार ब्रिटनी स्पिअर्स, आशियन पॅसिफिक पॉलिसी अॅण्ड प्लानिंग कौन्सिलच्या कार्यकारी संचालक मंजुषा पी. कुलकर्णी, अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक, जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला नगोझी ओकोन्झो इवियला यांचाही समावेश आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande