Custom Heading

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे रत्नागिरीत फळ व धान्याचे वाटप
रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे देशात स
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे रत्नागिरीत फळ व धान्याचे वाटप


रत्नागिरी, 17 सप्टेंबर, (हिं. स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे देशात सेवासप्ताह आयोजित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर आणि तालुका भाजपतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच निरीक्षणगृह संस्थेमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सफरचंद, केळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिकांचे सहकार्य लाभले. भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा सचिव सचिन वहाळकर, राजेश सावंत, राजेंद्र पटवर्धन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेविका मानसी करमरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande