Custom Heading

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती
संग्रहित


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी अभिष्टचिंतन केले आहे. आपल्या संदेशात दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांच्या आयुष्य आणि आरोग्याची कामना केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटर वर जारी केलेल्या संदेशात म्हंटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाबद्दल चे योगदान आणि त्याग अतुलनीय आहे. मोदींची राष्ट्रसेवा अशीच अविरत सुरू रहिली पाहिजे. ईश्वराने त्यांना निरामय आणि यशस्वी आणि दीर्घायुष्य प्रदान करावे अशी प्रार्थना करतो असे कोविंद यांनी आपल्या संदेशात नमूद केलेय. यासोबतच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देखील पंतप्रधानांचे अभिष्टचिंतन केले आहे. आपल्या संदेशात उपराष्ट्रपती म्हणाले की, मागील वर्ष अतिशय आव्हानात्मक होते. अशा कठीण काळात पंतप्रधानांनी संकटाच्या काळातही संधी शोधत देशात आत्मनिर्भरता आणि प्रेरणा निर्माण केली. पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात ऊर्जा प्राप्त झाली असून देश नव्या क्षितीजाकडे वाटचाल करीत आहे. तुमचे राष्ट्रनिर्माणाचे कार्य आणि प्रगतीचे प्रयत्न कायम यशस्वी ठरावेत अशा शब्दात नायडू यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande