पंतप्रधानांनी केले पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कौतुक
पुणे 17 सप्टेंबर (हिं.स) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधानांनी केले पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कौतुक


पुणे 17 सप्टेंबर (हिं.स) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ट्रस्टला पत्र पाठवून पंतप्रधानांनी मंडळाचे अभिनंदन केले आहे.ट्रस्टने यंदा ऑगमेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना पत्र पाठवले आहे.

गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करुन दिल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले आहे.गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील ७० हजार ६०५ गणेशभक्तांनी स्वत:च्या घरातून केली. उत्सवाच्या सहाव्या दिवसापर्यंत सुमारे ६० देशांतील भाविकांनी आॅगमेंटेंड रिअॅलिटी या ट्रस्टने पुढाकार घेऊन दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आरती केली. तर, २० हजारहून अधिक भाविकांनी अनेकदा या तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande