Custom Heading

गणपतीसाठी पुण्याला निघालेल्या तरुणाचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सोलापूरहून पुण्याकडे निघालेल
गणपतीसाठी पुण्याला निघालेल्या तरुणाचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू


पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या तरुणाचा रेल्वेच्या दरवाजातून तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. कपिल अंबादास गुुंडाघा (वय ३५, रा. कामगार वसाहत, सुनीलनगर, एमआयडीसी, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशोत्सवाचा माहोल असल्याने मृत कपिल हा आपल्या पाच मित्रांसमवेत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी कोईमतूर एक्स्प्रेसने सोलापूरहून पुण्याला निघाला होता. साेलापुरातून निघालेली रेल्वे महावितरण कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जुनी मिल कंपाउंड येथे आली असता बाथरूमला जातो असे मित्राला सांगून सीटवरून खाली उतरून रेल्वेच्या दरवाजात आला असता तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे तो जागीच ठार झाला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande