गणरायाला 500 पुस्तकांचा महानैवेद्य, पुण्यातील 50 मंडळांचा सहभाग
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) - डिजीटल युगात मुलांमध्ये पुस्तक संस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील 50 गणपत
गणरायाला 500 पुस्तकांचा महानैवेद्य, पुण्यातील 50 मंडळांचा सहभाग


पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) - डिजीटल युगात मुलांमध्ये पुस्तक संस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील 50 गणपती मंडळांनी पुढाकार घेत अनोखा उपक्रम राबविला. बुद्धीची देवता गणरायाला 500 पुस्तकांचा महानैवेद्य अर्पण केला. या पुस्तकांचे पुण्यातील आदिवासी भागातील वस्ती, दुर्गम भागात आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट तसेच जय गणेश व्यासपीठाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आले.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा उपस्थित होते. तसेच जय जवान मंडळाचे अमोल सारंगकर, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, वीर शिवराज मंडळाचे किरण सोनिवाल, नवज्योत मित्र मंडळाचे अमित जाधव, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, व्यवहारआळी मंडळाचे संतनू पातस्कर, राष्ट्रीय साततोटी मंडळाचे स्वप्नील दळवी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande