राष्ट्रवादीबरोबर आघाडी नकोच; सोलापुरातील काँग्रेसच्या बैठकीत उमटला सूर
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबले जात आह
राष्ट्रवादीबरोबर आघाडी नकोच; सोलापुरातील काँग्रेसच्या बैठकीत उमटला सूर


पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबले जात आहे. आघाडीचा धर्म पाळला जात नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत हे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढवून आपली ताकद दाखवू, अशी भूमिका मोहोळ, मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात मांडली.

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर तालुक्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मोहोळ, मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर तालुक्याचा त्यांनी आढावा घेतला. मोहोळ तालुक्याच्या बैठकीत माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जिल्हा महिलाध्यक्ष शाहीन शेख, देवानंद गुंड, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष गौरव खरात, राजेश पवार, हनुमंत पाटील, सुरेश शिवपुजे, शहराध्यक्ष पोपट कुंभार, रफिक पाटील, सुलेमान तांबोळी, भीमराव वसेकर, अरुण पाटील,किशोर पवार,बिरा खरात सुरेश हावळे यांनी हजेरी लावून तालुक्यातील स्थिती मांडली. तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस कार्यकर्त्यांना दाबत आहेत. मोहोळमध्ये काँग्रेसचे कार्यालय नाही. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करायची पण आपला वाटा कुठायं असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीत गटबाजी सुरू आहे. त्याची किमत ते मोजतील पण नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपली ताकद दाखवावीच लागेल, अशी मागणी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande