लस घेवूनही पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौ-यात अडथळे ?
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौ-यात अडथळे निर्माण होण्याची
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौ-यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता दिलेली नाही. तसेच अमेरिकेच्या अन्न-औषध प्रशासनानेही ही लस स्वीकारलेली नाही. यामुळे पंतप्रधानांच्या दौ-याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान ‘क्वाड’देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ सप्टेंबर रोजी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. ही परिषद वॉशिंग्टनमध्ये होणार असून भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, जपान हे देशही यात सहभागी होणार आहेत.

यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुमा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपस्थित राहणार आहेत. या परिषदेद्वारे पहिल्यांदाच सर्व देशाचे नेते एकमेकांसमोर येणार आहेत. बैठकीत तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जो बायडन यांनी पद सांभाळल्यानंतर त्यांची भेट घेण्याची पंतप्रधान मोदी यांची पहिलीच वेळ असणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande