घराच्या अंगणात लाख रुपयांची गांजाची झाडे, कारवाई नंतर प्रकार उघड
अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - पैसे कमविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अकोल्यातील पातूर मध्ये एक
photo


अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) - पैसे कमविण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अकोल्यातील पातूर मध्ये एकाने आपल्या घराच्या अंगणात गांजाची लागवड केली. पोलिसांना याची माहिती मिळताच लाखो रुपयांची गांजाची झाडे पोलिसानी जप्त करून आरोपीला अटक केली आहे. पातूर येथील शेख कय्युम शेख करीम याने आपल्या घराच्या अंगणात 15 गांजाची झाडे लावली होती.

दरम्यान पोलिसांना याची खबर लागल्याने पोलिसांनी आज कारवाई करत गांजाची 13 फूट उंच 15 झाडे जप्त केली आहेत. अंदाजे 22 किलो या गांजाची किंमत लाखाच्या वर आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून आरोपी विरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande