लष्करी परिचर्या सेवेचा 97 वा स्थापना दिन साजरा
पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : भारतात लष्करी परिचर्या, म्हणजे मिलिटरी नर्सिंग सेवेची स्थापना, मार्च 1888
Military Nursing Service


पुणे, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : भारतात लष्करी परिचर्या, म्हणजे मिलिटरी नर्सिंग सेवेची स्थापना, मार्च 1888 साली करण्यात आली होती. मात्र, आज ज्या स्वरुपात हे दल अस्तित्वात आहे, ते स्वरुप, 15 ऑगस्ट, 1943 पासून तयार झाले. गेल्या अनेक वर्षांच्या काळात, ही सेवा हळूहळू विकसित होत गेली आहे, आणि आज पाच हजार लष्करी परिचर्या अधिकारी, तिन्ही दलांतील जवानांची शुश्रूषा करण्यास सज्ज आहेत. लष्करी परिचर्या सेवेतील अधिकारी कायमच या सेवेत अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर उपचार पद्धतीत करण्याचा प्रयत्न करतात. तसेच, स्नेहभावाने सेवा करतांना परिचर्या विभागाचे प्रोटॉकॉल्स देखील काटेकोरपणे पाळतात. सर्व सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना, त्या सक्षमपणे नर्सिंग सेवा देतात.

पुणे गॅरिसनच्या परिचर्या अधिकाऱ्यांनी, आज एक ऑक्टोबर 2022 रोजी कोविड महामारीच्या विरामामुळे, दोन वर्षानंतर 97 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. या प्रसंगी अधिका-यांनी त्यांच्या रुग्णांप्रती सहानुभूती बाळगत, उत्तम व्यावसायिक दृष्टिकोनातून उच्च दर्जाची नर्सिंग सेवा देण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

लष्करी परिचर्या सेवेच्या दक्षिण मुख्यालयातील प्रमुख, ब्रिगेडियर अमिता देवराणी आणि पुणे गॅरिसनच्या सर्व परिचर्या अधिकारी यांनी यानिमित्त एक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या समारंभात बोलतांना, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, दक्षिण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल, अरविंद वालिया यांनी, कोविड महामारीच्या काळातील परिचर्या दलाच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशाचा आपल्या लष्करी दलांवर जो प्रगाढ विश्वास आहे, तो या दलाने या काळात सार्थ ठरवला, असेही ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande