अकोला अँटी चैन स्नॅचिंग मोहीम, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 38 दुचाकी जप्त
अकोला, 1 ऑक्टोबर(हिं.स.)आज रोजी अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात अ
photo


अकोला, 1 ऑक्टोबर(हिं.स.)आज रोजी अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात अँटी चैन स्नाचिंग मोहीम अंतर्गत वेगवेगळ्या मार्गामध्ये नाकाबंदी करून 38 दुचाकी वाहने डिटेन करण्यात आले.

तसेच सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विशेष मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 12 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

अकोला शहरातील उड्डाण पुलावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व बेशिस्त पणे वाहने उभी करून वाहतूककिस अडथळा निर्माण करीत असलेल्या एकूण 41 वाहन धारक विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

तसेच आगामी सन उत्सव दरम्यान दारू पिवून वाहन चलवीणारे इसमांचीही ट्राफिक ब्रँच कडून चौकचौकात तपासणी केली जात आहेत. कोणीही मद्य सेवन करून वाहन चालवू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करुन गुन्हा नोंदविन्यात येईल असे आवाहन पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande