ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोरचे सर्व दरवाजे खुले
चंद्रपूर 1 ऑक्टोबर (हिं.स.) : पावसाळ्यामुळे तीन महिने बंद राहिल्यानंतर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल
ताडोबा व्याघ्र प्रकल्प


चंद्रपूर 1 ऑक्टोबर (हिं.स.) : पावसाळ्यामुळे तीन महिने बंद राहिल्यानंतर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोरचे सर्व दरवाजे एक ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत.

ताडोबा प्रकल्पाच्या गाभा (कोर) क्षेत्रात पावसाळ्यात पर्यटन पूर्णपणे बंद ठेवले जाते. त्यानंतर आता पुन्हा प्रकल्प सुरू झाला आहे. कोरच्या सर्वच प्रवेशद्वारातून दोन्ही पाळीत सफारीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ताडोबाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यटकांना आता व्याघ्र दर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. चंद्रपूर येथील मुक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी सफारी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande