काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदल ही कार्यकर्त्यांची इच्छा- शशी थरूर
नागपूर, 01 ऑक्टोबर (हिं.स.): पक्ष नेतृत्त्वात बदल व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांनी आपल्
शशी थरूर


नागपूर, 01 ऑक्टोबर (हिं.स.): पक्ष नेतृत्त्वात बदल व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यास सांगितल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. थरुर यांनी शनिवारी नागपुरातील दीक्षाभूमीचे दर्शन करून आपल्या प्रचाराला सुरुवात करताना बोलत होते.

यावेळी थरूर म्हणाले की, त्यांच्यात आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. शशी थरूर यांनी दावा केला की, पक्षात बदल हवा असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगितले. युवक काँग्रेसचा आवाज बनण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. 'अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी मला सांगितले की तुम्ही लढा मला 60 पैकी 50सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज व्हायचे आहे ज्यांना पक्षात बदल हवा आहे. मला युवक काँग्रेसचा आवाज व्हायचे आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचा आत्मविश्वास चांगला आहे. मला खात्री आहे की असे काही लोक आहेत जे माझे देखील ऐकतील. मोठे नेते स्वाभाविकपणे पक्षातील इतर मोठ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात. परंतु ,माझ्यासोबत विविध राज्यातील कार्यकर्ते आहेत. आम्ही मोठ्या नेत्यांना मान देतो पण पक्षातील तरुणांचे ऐकण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याचे काम आम्ही करणार असून कार्यकर्त्यांना हे महत्त्व दिले पाहिजे. काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक हा मैत्रीपूर्ण सामना आहे. आमची अनेक उद्दिष्टे आहेत आणि आम्ही पाठिंबा शोधत आहोत असे थरूर म्हणाले. दरम्यान राजस्थानातील अंतर्गत कलहामुळे अशोक गेहलोत निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता सामना शशी थरूर विरुद्ध खर्गे यांच्यात आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande