गोंदिया : तंटा मुक्त समिती अध्यक्ष निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याला मारहाण
गोंदिया, ०२ ऑक्टोबर, (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यातील कटंगी कला ग्रामपंचायतमध्ये तंटामुक्त समिती अध्यक
गोंदिया : तंटा मुक्त समिती अध्यक्ष निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्याला मारहाण


गोंदिया, ०२ ऑक्टोबर, (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यातील कटंगी कला ग्रामपंचायतमध्ये तंटामुक्त समिती अध्यक्ष पदाची निवडणुक सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य प्रितम लिल्हारे (४६ वर्ष) यांना गावातील काही युवकांनी मारहाण केली. गावात अध्यक्ष निवडी करीता वाद होण्याची शक्यता असताना पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. या निवडणुकीदरम्यान पोलीस उपस्थित असताना सुध्दा ग्रामपंचायत सदस्य प्रितम लिल्हारे यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रितम यांनी आलेल्या युवकांना निवडणुकीमध्ये अळथळा करू नका, असे समजविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्या युवकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. सध्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande