अमरावती ग्रा. पं. कडून प्रस्ताव न आल्याने सेस फंडातील 17 कोटींचा निधी अखर्चित
अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा परिषदेच्या सेस फंडात ग्रामविकास निधी अंतर्गत वर्षभरात एकाही ग्रा
अमरावती ग्रा. पं. कडून प्रस्ताव न आल्याने सेस फंडातील 17 कोटींचा निधी अखर्चित


अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)

जिल्हा परिषदेच्या सेस फंडात ग्रामविकास निधी अंतर्गत वर्षभरात एकाही ग्रामपंचायतींकडून कामांकरिता प्रस्ताव दाखल झाला नसल्याचे १७ कोटी ५ लाख ३३ हजारांचा निधी अखर्चित राहिला आहे. या अखर्चित निधीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहेत. दोन दिवसांत याची माहिती न दिल्यास कारवाई करण्याचा दम उपसचिवांनी दिला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नातून २५ टक्के निधी जि. प. कडे जमा करावा लागतो. हा निधी जि. प. ग्रामपंचायतींना विकास कामासाठी देते. जिल्ह्यात २०२१ ते २०२२ मार्च अखेरीस जिल्हा परिषदेकडे १७ कोटी ५ लाख ३३ हजार ९६ रूपयांचा निधी गोळा झाला आहे. परंतु खेड येथील ४० लाखांचा प्रस्ताव वगळता एकाही ग्रा.पं.ने ग्रामविकासाच्या कामांकरिता प्रस्ताव पाठवला नाही. जि. प. त सध्या प्रशासक राज आहे.

एकही प्रस्ताव निधीच्या मागणी करिता न येणे हे विशेष आहे. त्यामुळे निधी अखर्चित राहिला आहे. ग्रामविकास मंत्रालयाकडून यापूर्वी या अखर्चित निधीची माहिती मागितली होती. परंतु, जि. प. ने ही माहिती शासनाकडे सादर केली नाही. त्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिवांनी तातडीचे पत्र देऊन या शिल्लक रक्कमेबाबतची माहिती दोन दिवसात ई-मेलद्वारे पाठवण्याबाबत आदेश दिले आहे. या निधीबाबत उपविधान समिती, महाराष्ट्र विधानमंडळ विधान भवन यांच्याकडून शासनास वारंवार विचारणा करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande