भारतात 5-जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ
नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : देशात आज, शनिवारपासून 5-जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे. इंडिय
पंतप्रधानांच्या हस्ते ५-जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ


नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : देशात आज, शनिवारपासून 5-जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5-जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ केला. 5-जी इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेल यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5-जी इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.

सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5-जी सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5-जी चे फायदे आणि 5-जी सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारे तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5-जी नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5-जी सेवेचा मोठा फायदा होईल.

भारताला 5-जी नेटवर्कचा खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5-जी नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यका. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5-जी नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande