36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : ट्रॅक सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या मयुरी लुटेला कांस्यपदक
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ट्रॅक सायकलिंग खेळाच्या स्पर्
Mayuri Lute


नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ट्रॅक सायकलिंग खेळाच्या स्पर्धांना आज नवी दिल्ली येथील आय. जी. स्टेडियम मधील वेलोड्रमवर सुरुवात झाली.

स्पर्धेचे उदघाटन केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याच्या सचिव सुजाता चतुर्वेदी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी सीएफआईचे महासचिव मनेंदर पाल सिंग आणि सी एफ आय चे खजिनदार प्रताप जाधव उपस्थित होते.

महाराष्ट्राला सायकलिंगमधील पहिले पदक आज मयुरी लुटे या आंतरराष्ट्रीय खेळाडूने मिळून दिले. 500 मीटर महिलांच्या टाईम ट्रायल प्रकारात 36.837 सेकंद वेळ नोंदवताना तिने कास्यपदक पटकावले. या प्रकारात पश्चिम बंगालच्या त्रिषा पॉल हिने सुवर्णपदक पटकावताना 35.666 सेकंद वेळ नोंदवली तर मणिपूरच्या एम सोनाली चानू हिने रौप्य पदक मिळवताना 36.60 सेकंद वेळ दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande