रक्तदान अमृत महोत्सवाच्या यशाने मानवतेच्या उदात्त हेतूला बळ दिले - डॉ. मनसुख मांडवीय
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : रक्तदान अमृत महोत्सवाला मिळालेल्या यशाने मानवतेच्या उदात्त हेतूला
राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन कार्यक्रम


नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : रक्तदान अमृत महोत्सवाला मिळालेल्या यशाने मानवतेच्या उदात्त हेतूला बळ दिले आहे, जे अनेक मौल्यवान जीव वाचविण्यात मोठी मदत करेल. राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त आपण सर्वांनी दुसऱ्यासाठी नेहमी तत्पर राहण्याची आणि नियमितपणे रक्तदान करण्याची प्रतिज्ञा घेऊया.” असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) राष्ट्रीय रक्तदान दिवस 2022 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना हे सांगितले.

रक्तदानाचे महत्त्व सांगताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, रक्तदान ही सेवा आहे. आणि, एकमेकांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. कोविड महामारीचा भारताने केलेला सामना हा लोकभागीदारीच्या समृद्ध परंपरेमधून प्रेरित होता आणि त्याने या महामारीचे व्यवस्थापन करण्याचा मार्ग दाखवला आणि यामधून जगातील सर्वात मोठा कोविड लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला. रक्तदान, रक्त वितरण आणि रक्त व्यवस्थापन हे रक्तदान अमृत महोत्सवाचे उद्दिष्ट होते. यामुळे नियमित विनामोबदला ऐच्छिक रक्तदानाबद्दल जागरुकता वाढवण्यात आणि रक्त अथवा त्याचे घटक (संपूर्ण रक्त/ पॅक केलेल्या लाल रक्तपेशी/ प्लाझ्मा/ प्लेटलेट्स) उपलब्ध, परवडणारे आणि सुरक्षित सुनिश्चित करायला मदत झाली.रक्तदान अमृत महोत्सवाला मिळालेल्या यशाने मानवतेच्या उदात्त हेतूला बळ मिळाले, जे अनेक मौल्यवान प्राण वाचवायला अत्यंत उपयोगी ठरेल. रक्तदान अमृत महोत्सवामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी ऐच्छिक रक्तदान केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ऐच्छिक रक्तदाते आणि अनुकरणीय कामगिरी करणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश, दुर्मिळ रक्तगटाचे दाते, नियमित सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) दाते, महिला रक्तदाते, यांचा यावेळी सत्कार केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande