स्वच्छ शहर सर्वेक्षणाच नाशिक विसाव्या स्थानी
नाशिक, 01ऑक्टोबर (हिं.स.) :कोट्यवधीचा खर्च करुनही स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक शहराची देशात विसाव्या
स्वच्छ शहर सर्वेक्षणाच नाशिक विसाव्या स्थानी


नाशिक, 01ऑक्टोबर (हिं.स.) :कोट्यवधीचा खर्च करुनही स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक शहराची देशात विसाव्या स्थानी घसरगुंडी झाली आहे. गतवेळेस नाशिक शहर १७ व्या स्थानी होते. सलग दुसर्यावर्षी नाशिकची सर्वेक्षणात पिचेहाट झाली आहे. थोडाफार दिलासा म्हणजे महाराष्ट्रात स्वच्छतेत नाशिकचा पाचवा क्रमांक आला आहे.

केंद्र सरकारकडून महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि.१) स्वच्छ शहर सर्वेक्षण क्रमाकांची यादी जाहीर झाली. या सर्वेक्षणात नाशिकची शहर सलग दुसर्या वर्षी घसरण झाली. नाशिक थेट विसाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. भारतात वीस तर राज्यात पाचव्या क्रमांकावर ही घसरण झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेने कोटय़वधींचा खर्च पाहिल्या टॉप टेन मध्ये क्रमांक पटकावण्याचा निर्धार घनकचरा विभागाने केला होता. परंतू निकाल लागल्यावर शनिवारी नाशिककरांची पूर्णपणे निराशा झाली. यासंदर्भात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, स्वच्छ शहर सर्वेक्षणात देशात आपण विसाव्या तर राज्यात पाचव्या स्थानी आहोत. आगामी काळात स्वच्छतेवर अधिक जोमाने काम करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande