गोंदिया : विद्यार्थाला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित
गोंदिया, ०१ ऑक्टोबर, (हिं.स.) : पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण केल्याची घटना समो
गोंदिया : विद्यार्थाला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित


गोंदिया, ०१ ऑक्टोबर, (हिं.स.) : पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलयाअंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थाच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळे शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

देवरी तालुक्यात आदिवासी विभागाअंतर्गत शासकिय आश्रम शाळा चालविल्या जात आहेत. बोरगाव येथे निवासी शाळा असल्याने आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पण पाचव्या वर्गात शिकत असलेल्या अक्षय पंधरे या विद्यार्थ्याला ठेंगरे नामक शिक्षकाने मारहाण केली त्यामुळे अक्षय याच्या डोक्याला मार लागला. अक्षयने संपुर्ण घटना आपल्या घरच्या लोकांना सांगितली असताना घरच्या लोकांनी प्रकल्प कार्यालयात शिक्षकाविरुध्द तक्रार दाखल केली. त्यामुळे प्रकल्प अधिकारी राचेलवर यांनी तात्काळ शाळेत पोहचत विद्यार्थ्याला उपचारा करीता रूग्णालयात पाठवत चौकशी केली असता ठेंगरे या शिक्षकाला निलंबित केले आहे. तर, शासन आदिवासी आश्रम शाळेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर, असा शिक्षकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande