महाराष्ट्र क्रिकेट मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा; नाशिक व पुणे सहज विजय
नाशिक, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर
महाराष्ट्र क्रिकेट मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा; नाशिक व पुणे सहज विजय


नाशिक, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , पहिल्या सामन्यात महात्मानगर क्रिकेट मैदानावर नाशिक जिल्हा संघाने परभणीवर ७ गडी राखून आरामात विजय मिळवला.

नाशिकच्या ए गटात परभणी ,सांगली व पुणे हे इतर संघ आहेत. एक दिवसीय मर्यादित ५० षटकांच्या स्वरूपात सदर स्पर्धा खेळवली जात आहे. महात्मानगर क्रिकेट मैदानावर परभणी ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली , पण पाहिल्याच षटकात श्रुति गीतेने दोन बळी घेतले. हंसिका शर्मा २१ व समृद्धि विशंभरे १४ सोडल्यास नाशिकच्या गोलंदाजी समोर कोणीच न टिकल्यामुळे २६.५ षटकांत ७६ धावांवर परभणी संघ सर्वबाद झाला . नाशिकतर्फे श्रुति गीतेने ४ , निशी छोरियाने ३ तर अस्मिता खैरनार व गौरी गुप्ते यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठीच्या ७७ धावा नाशिकने १४.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केल्या. सायली टिकेकर व निशी छोरिया या दोघींनीही प्रत्येकी नाबाद १५ धावा केल्या.

तर एस एस के मैदानावरील दुसर्या सामन्यात पुणेने देखील सांगली वर ८ गडी राखून सहज मात केली. सांगली ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. सांगलीच्या सरस्वती कोकरेने २४ व सह्याद्रि कदमने १४ धावा केल्या . पुण्याच्या मृण्मयी क्षीरसागरने ५ तर गायत्री ने ३ बळी घेत २१.४ षटकांत ६३ धावांत सांगलीचा डाव संपवला. नंतर पुणेने भाविका अहिरेच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर १५.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande