राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता नगरच्या 6 खेळाडूंची राज्य संघात निवड
अहमदनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.):- राष्ट्रीय रायफल स्पर्धेत शहरातील अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल श
राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता नगरच्या 6 खेळाडूंची राज्याच्या संघात निवड


अहमदनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.):- राष्ट्रीय रायफल स्पर्धेत शहरातील अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या ६ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, हे खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.केरळ राज्यात त्रिवेंद्रम या ठिकाणी ८ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय रायफल स्पर्धा होणार आहे.यामध्ये पीप साईट रायफल मध्ये ओम सानप,यश कदम,पार्थ छाजेड,गौरव घोडके,विराज चव्हाण,मोहित गवई या खेळाडूं ची निवड झाली आहे.या खेळाडूंचा महाराष्ट्र संघात निवड झाल्या बद्दल वाडियापार्क क्रीडा संकुल येथे सत्कार करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या खेळाडूंचे आ.संग्राम जगताप,क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे,घन श्याम सानप, संजय साठे,रविंद्र कदम यांनी अभिनंदन केले.हे खेळाडू मुख्य प्रशिक्षक छबुराव काळे,प्रशिक्षक अलीम शेख,ऋषिकेश दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande