धुळे : अवैध गॅस पंपावर छापा, १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे, 23 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील वडजाई रोड परिसरातील स्लॉटर हाऊसच्या मागे सार्वजनिक शौचालयाजवळ अव
धुळे : अवैध गॅस पंपावर छापा, १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त


धुळे, 23 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील वडजाई रोड परिसरातील स्लॉटर हाऊसच्या मागे सार्वजनिक शौचालयाजवळ अवैध गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस येत असल्याचे लक्षात येताच एक वाहन चालक पळून गेला.

उपविभागीय सहा.पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडजाई रोड स्लॉटर हाऊस मागे सार्वजनिक शौचालयाजवळ एक इसम गॅस सिलिंडर मधून वाहनांमध्ये मोटरच्या सहाय्याने गॅस भरतांना आढळून आला. यावेळी गॅस भरणारा वाहन चालक पळून गेला. घटनास्थळाहून शेख सलीम शेख रईम (वय ३५)रा. वडजाई रोड स्लॉटर हाऊसच्या मागे त्याला ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून गॅस सिलींडर, वेगनआर वाहन, गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रीक मोटर, वजन काटा असा एकूण १ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे ईसी ऍक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande