परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांची म्यानमार भेट संपन्न
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स) भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी नुकतीच म्यानमार
परराष्ट्र सचिव


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स)

भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी नुकतीच म्यानमारला भेट दिली. त्यांनी म्यानमारच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत झालेल्या बैठकींमध्ये परराष्ट्र सचिवांनी भारत आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात सुरक्षा आणि स्थिरता राखण्याबाबत चर्चा केली;

परराष्ट्र सचिवांनी म्यानमारच्या म्यावाड्डी भागात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेटद्वारे मानवी तस्करीचा मुद्दा उपस्थित केला ज्यामध्ये अनेक भारतीय नागरिक पकडले गेले आणि द्विपक्षीय विकास सहकार्य प्रकल्पांचा आढावा घेतला.

परराष्ट्र सचिवांनी भारत-म्यानमार सीमावर्ती भागांसह लोककेंद्रित सामाजिक-आर्थिक विकास प्रकल्पांना भारताचे सतत समर्थन तसेच कलादान मल्टीमॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प आणि त्रिपक्षीय यासारख्या चालू कनेक्टिव्हिटी उपक्रमांच्या जलद अंमलबजावणीसाठी भारताची वचनबद्धता व्यक्त केली.

परराष्ट्र सचिवांनी म्यानमारच्या लोकांच्या फायद्यासाठी राखीन राज्य विकास कार्यक्रम आणि सीमा क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत प्रकल्प सुरू ठेवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande