मुलींच्या क्रिकेट स्पर्धा; नाशिक व पुण्याचा दुसरा विजय
नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच
क्रिकेटपटू


नाशिक मध्ये आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , तिसर्या सामन्यात महात्मानगर क्रिकेट मैदानावर नाशिक जिल्हा संघाने सांगलीवर अटीतटीच्या लढतीत मात केली व आपला लागोपाठ दूसरा विजय नोंदवला.

महात्मानगर क्रिकेट मैदानावर नाशिकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली व सायली टिळेकरच्या ३८ धावांच्या जोरावर ९ बाद १५३ धाव संख्या उभारली .प्रचिती भवर १७ व श्रुति गीतेने १४ धावा करत तिला साथ दिली. सांगलीतर्फे सह्याद्रि कदमने ३ गडी बाद केले. तर निधि शांभवी व भावी पुनमियाने प्रत्येकी २ बळी घेतले. उत्तरादाखल सह्याद्रि कदमने जोरदार ४५ धावा फटकावल्या . निधि शांभवीने २० व भावी पुनमियाने ११ धावा केल्या . पण ५ बाद १०५ व ६ बाद १३६ वरुन नाशिकच्या मुलींनी सांगलीला १४१ धावात सर्वबाद करून १२ धावांनी विजय मिळवला. नाशिकतर्फे सिध्हि पिंगळेने ३ तर प्रचिती भवर ने २ तर कार्तिकी देशमुख , अस्मिता खैरनार व निशी छोरियाने प्रत्येकी १ बळी घेतला. सिध्हि पिंगळे तसेच श्रुति गीते व सावनी निकम यांनी केलेले धावबाद व प्रचिती भवरची गोलंदाजी शेवटी निर्णायक ठरली.

तर एस एस के मैदानावरील चौथ्या सामन्यात पुणेने परभणीवर ३२५ धावांनी मोठा विजय मिळवला .सुहानी खंडाळ च्या जोरदार नाबाद ९२ व भाविका अहिरेच्या ८० तसेच महेक मुल्लाच्या ४९ धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत पुणेने ४ बाद ३५४ अशी मोठी धावसंख्या उभारली. नंतर परभणीला केवळ २९ धावात सर्वबाद करत आपला दूसरा विजय नोंदवला. पुणेतर्फे वेदिका दळवीने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत केवळ ४.३ षटकांत ५ गडी बाद केले. तिला निकिता सिंगच्या ३ व गायत्री सुर्वसेच्या १ बळी ची साथ मिळाली.

पुढील सामने : नाशिक विरुद्ध पुणे व परभणी विरुद्ध सांगली .

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande