भारत-इंडोनेशिया विशेष सैन्य दलाचा 'गरुड शक्ती' संयुक्त सराव सुरू
जकार्ता, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : लष्करी विनिमय कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, भारतीय विशेष दलाच्या तुक
India Indonesia Garuda Shakti exercise 


जकार्ता, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : लष्करी विनिमय कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, भारतीय विशेष दलाच्या तुकड्या सध्या इंडोनेशियातील सांगा बुआना प्रशिक्षण क्षेत्र, करावांग, इंडोनेशिया येथे इंडोनेशियाच्या विशेष दलासोबत 'गरुड शक्ती' या द्विपक्षीय संयुक्त प्रशिक्षण सरावात व्यस्त आहेत. 'गरुड शक्ती' या शीर्षकाखाली द्विपक्षीय लष्करी सराव मालिकेची ही आठवी आवृत्ती आहे.

21 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झालेल्या या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमधील समज, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा आहे. या संयुक्त सरावामध्ये विशेष सैन्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभिमुखता, शस्त्रास्त्रे, उपकरणे, नवकल्पना, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती आणि हाती घेतलेल्या विविध मोहीमातून शिकलेले धडे, जंगलातील विशेष सैन्याच्या मोहीमा, दहशतवादी तळांवर हल्ले तसेच लष्करी सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांच्या जीवनशैली आणि संस्कृती बाबत अंतर्दृष्टी प्राप्त करण्याव्यतिरिक्त मूलभूत आणि आगाऊ विशेष सैन्य कौशल्ये एकत्रित करणारा प्रमाणीकरण सराव यावरील माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. या संयुक्त प्रशिक्षणामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, रणनीतिक खेळ कवायती, तंत्रे आणि कार्यपद्धती यावरही भर दिला जाईल. यासाठी 13 दिवसांचा सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या सराव शिबीराची सांगता 48 तासांच्या वैधता सराव सत्राने होईल.

या संयुक्त सरावामुळे दोन्ही सैन्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता घेईल तसेच दहशतवादी विरोधी कारवाया, प्रादेशिक सुरक्षा मोहीम आणि आंतरराष्ट्रीय वातावरणात शांतता राखण्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपले विस्तृत आणि लढाऊ अनुभव सामायिक करतील. हा सराव दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणि प्रादेशिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande