लग्नापूर्वी दडविला सिकलसेल आजार ; विवाहितेची पोलिसात तक्रारकौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल
अमरावती, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : पतीने लग्नापूर्वी सिकलसेल हा गंभीर आजार व हिप ज्वाईंट ऑपरेशन झाल्या
संग्रहित


अमरावती, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : पतीने लग्नापूर्वी सिकलसेल हा गंभीर आजार व हिप ज्वाईंट ऑपरेशन झाल्याचे दडवून ठेऊन फसवणूक केल्याची तक्रार एका विवाहितेने राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी तिचा पती स्वप्निल शेंडे, सासरा विठ्ठल शेंडे व एक महिला (सर्व रा. उत्तमनगर, पुणे) यांच्याविरूद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

१८ फेब्रुवारी ते ५ जुलै रोजीदरम्यान ती छळमालिका चालली. पती व सासरच्या मंडळीने अगदी लग्नाच्या काही दिवसांपासूनच तिचा छळ सुरू केला. तिच्याकडून ४५ हजार रुपये घेतले. त्यापुर्वी तिच्या माहेरच्या मंडळीने तिच्या लग्नावर ६ लाख रुपये खर्च केला. मात्र, सासरी गेल्यानंतर काहीच दिवसात आपला पती सिकलसेल ग्रस्त व त्याचे हिप ज्वाईंट ऑपरेशन झाल्याचे तिच्या लक्षात आले. पती व सासरच्या मंडळीने लग्न जुळविताना ती बाब दडवून ठेऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार तिने नोंदविली. राजापेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक मानकर पुढील तपास करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande