जिल्ह्यातील स्पर्धांमधून भारतीय संघाला मिळाले क्रिकेटपटू - आ. संजय केळकर
ठाणे, २३ नोव्हेंबर, (हिं.स) गेली साडेचार दशके अखंडितपणे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असून त्यातून अन
आ. संजय केळकर


ठाणे, २३ नोव्हेंबर, (हिं.स) गेली साडेचार दशके अखंडितपणे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असून त्यातून अनेक खेळाडू भारतीय संघाला मिळाले. अशा स्पर्धांतूनच ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटू पुढे येतील, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. सेंट्रल मैदान येथे डॉ.राजेश मढवी यांनी अर्जुन मढवी २०-२० महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचे उदघाटन आमदार संजय केळकर यांनी केले. त्यावेळी आयोजक श्री. मढवी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचे कौतुक केले.

पूर्वी क्रिकेट म्हणजे मुंबई असे समिकरण होते. मात्र आता राज्य स्पर्धांपासून मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय संघातही ठाणे जिल्ह्यातील खेळाडू दिसत आहेत. गेली ४४ वर्षे सुरू असलेल्या एमसीएअंतर्गत एन. टी. केळकर स्पर्धेतून मुंबई आणि भारतीय संघाला नावाजलेले क्रिकेटपटू मिळाले आहेत. अशा स्पर्धांमधूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळून ते यशस्वी होतात, असे श्री. केळकर यांनी सांगितले.

आता जागतिक स्तरावरही महिला क्रिकेट संघ चमकदार कामगिरी करत आहे. मुलींना प्रोत्साहन आणि संधी मिळाली तर ठाणे जिल्ह्यातील मुली मोठ्या प्रमाणात मुंबई आणि भारतीय संघात दिसतील. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे सांगत श्री केळकर यांनी अर्जुन मढवी २०-२० महिला क्रिकेट स्पर्धा महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande