रत्नागिरी : नारळ झाडावर चढण्याकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : नारळ झाडावर चढण्याकरिता येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फ
रत्नागिरी : नारळ झाडावर चढण्याकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : नारळ झाडावर चढण्याकरिता येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

नारळ हे कोकणातील एक महत्त्वाचे पीक आहे. सध्या नारळ लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु नारळ पाडण्यासाठी आवश्यक असणारी पाडकरी माणसे हळूहळू कमी होत आहेत. नारळ बागायतदारांना नारळ पाडणाऱ्यांची समस्या भेडसावू लागली आहे. यावर मात करण्यासाठी तरुण पिढीला नारळ झाडावर चढण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. तरुणांनी नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिले तर भविष्यात अर्थार्जनाचे चांगले साधन उपलब्ध होऊ शकेल. याच उद्देशाने प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रथम येणार्यास प्राधान्य असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांनी कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी या पत्त्यावर आपला लेखी अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवावा. अर्जात पूर्ण नाव, जन्मतारीख, पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, सध्याचे रोजगाराचे साधन, भविष्यामध्ये इच्छुक काम, वारसदाराचे नाव तसेच आधारकार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी. अर्जांची छाननी करून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना भ्रमणध्वनीद्वारे प्रशिक्षणाची तारीख कळविण्यात येईल.रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुकांनी कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर २० गरजू प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande