डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या अविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप. बँकेची निवडणूक अविरोध करण्यासाठी आ
डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या अविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप. बँकेची निवडणूक अविरोध करण्यासाठी आता जिल्ह्यातील सहकार नेत्यांनी एकमेकांमधील रूसवे फुगवे बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असून ही निवडणूक अविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये उमेदवारांची नावे देखील नेत्यांकडून निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे १७ व्यतिरिक्त अन्य ४९ नामांकन मागे इच्छुकांची मनधरणी केली जात आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप. बँकेची१७ संचालक पदांकरिता ११ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. याकरिता६६ नामांकन दाखल झाले आहेत.२९ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आलीअसताना अद्याप एकही नामांकन मागे घेण्यात आला नाही. त्यामुळे बँकेच्यानिवडणुकीत रंगत येण्याची चित्रे दिसत असताना सहकार नेत्यांनी मात्रएकत्र येऊन ही निवडणूक अविरोध करण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. या निवडणुकीमध्ये १२ विद्यमान तसेच एका माजी संचालकांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे निवडणूक अविरोध करताना काही विद्यमान संचालकांना डच्चू बसणार आहे. याशिवाय सहकार नेत्यांच्या काही हितचिंतकांना देखील उमेदवारीतून माघार घेण्याकरिता नेत्यांची बोलनी सुरू असल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत बँकेचे माजीअध्यक्ष स्व. संजय वानखडे यांच्या विरोधात दिलीप इंगोले यांचे पॅनल रिंगणात होते. यावेळी दिलीप इंगोले यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी त्यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी दाखल केली आहे. अशा काही दिग्गज सहकार नेत्यांच्या

प्रतिष्ठेचा विषय असलेली ही निवडणूक अविरोध करण्याकरिता सर्वच गटतट व दिग्गज सहकार नेते एकत्र बसून शर्तीचे प्रयत्न करीत असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. त्यामुळे यात ते किती यशस्वी होतात, निवडणुक अविरोध होईल का, हे मात्र दोन दिवसात कळणार आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता आणखी सहा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे यातील तब्बल ४९ नामांकन अर्ज मागे घेण्याचे मोठे आव्हान सहकार नेत्यांसमोर उभे ठाकले आहे.

या उमेदवारांची चर्चा

बँकेत १७ संचालक निवडून द्यावयाचे असल्याने यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र महल्ले, अभय ढोबळे, डॉ. अंजली ठाकरे, डॉ. सुनील लव्हाळे, यशपाल वरठे, नरेंद्र पाटील, सुगंध बंड, सुरेंद्र गावंडे, ओकांर बंड, बाळाकृष्ण अढाऊ, प्रशांत डवरे, अक्षय इंगोले, भैय्या मेटकर, अमोल बारब्दे, गिरीश भारसाकळे, पुनम चौधरी या १६ उमेदवारांचे अर्ज संचालक पदाकरिता कायम ठेवले जाणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय एका उमेदवाराबाबत देखील चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande