कलाकार सांगत आहेत त्यांच्या सह-कलाकारांकडून अवलंबलेल्या सवयींबाबत
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : कौशल्ये व टॅलेण्ट या व्यतिरिक्त कलाकार त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमामध
आयुध भानुशाली - नेहा जोशी


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : कौशल्ये व टॅलेण्ट या व्यतिरिक्त कलाकार त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये त्यांच्या सह-कलाकारांच्या सवयींचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो. एण्ड टीव्हीवरील कलाकार आपल्याला काही सवयींबाबत सांगत आहेत, ज्या त्यांनी त्यांच्या सह-कलाकारांकडून अवलंबल्या आहेत आणि अधिक प्रभाव घडवून आणण्यासाठी दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करत आहेत. हे कलाकार आहेत आयुध भानुशाली (कृष्णा, ‘दूसरी मॉं’), सपना सिकरवार (बिमलेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’).

एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, “जयपूरमध्ये मालिका ‘दूसरी मॉं’च्या सेटवर आम्ही सर्व खूप धमाल करतो आणि एकमेकांकडून भरपूर काही शिकतो. पण सर्व सह-कलाकारांमध्ये नेहा जोशी (यशोदा) सर्वात परफेक्शनिस्ट व नीटनेटकेपणा राखणाऱ्या आहेत. त्या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये ओळखल्या जातात आणि त्या पॅटर्न्स ओळखू शकतात, जे इतर कोणालाही जमत नाही. नेहा यांच्या या चांगल्या सवयींनी माझे लक्ष वेधून घेतले आहे. मी दिवसातून कधीही त्यांच्या रूममध्ये जातो तेव्हा सर्वकाही व्यवस्थित व टापटीप असते. त्यांचे इतके लक्ष असते की त्यांचा ब्रश थोडासा देखील हलला, तरी त्यांच्या ते लक्षात येईल. त्या त्यांच्या चुका कधीच लपवणार नाहीत, तर त्यामध्ये त्वरित सुधारणा करतात. त्यांची ही सर्वात चांगली सवय आहे, जी प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकारली पाहिजे. त्यांचा आदर्श घेत मी देखील माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास सुरूवात केली आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा की असे केल्याने तुमचा अर्धा त्रास कमी होतो. मला गोष्टी शोधण्यासाठी अधिक वेळ घालवावा लागत नाही आणि मी इतर महत्वपूर्ण गोष्टींसाठी वेळ देऊ शकतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांच्या सवयी देखील प्रकर्षाने दिसून येतात.’’

एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये बिमलेशची भूमिका साकारणाऱ्या सपना सिकरवार म्हणाल्या, “मला सांगावेसे वाटते की, मी माझ्या सह-कलाकार हिमानी जी (कटोरी अम्मा) यांच्याकडून चांगली सवय अवलंबली आहे. त्या खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्याकडून नेहमीच भरपूर काही शिकायला मिळते. त्यांच्याकडून मी अंगिकारलेली एक सवय म्हणजे फोनपेक्षा लोकांना अधिक प्राधान्य देणे. आमची मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’च्या सेटवर तुम्हाला लोक शूटिंग करत नसताना त्यांच्या फोन्समध्ये गुंतलेले पाहायला मिळतील. तुम्हाला ते मोकळ्या वेळेमध्ये रिल्स किंवा चित्रपट किंवा मालिका पाहताना दिसतील, पण हिमानीजी नेहमीच टीमसोबत असताना त्यांच्या फोनपासून दूर राहण्याची काळजी घेतात आणि त्यांची ही सवय खूपच चांगली आहे. आम्ही शूटिंग करत असताना, एकत्र लंच करत असताना किंवा गप्पागोष्टी करताना त्या कधीच त्यांच्या फोनला हात लावत नाहीत. फोनवर आलेला कॉल कितीही महत्त्वाचा असो त्या प्रथम त्यांच्यासमोर असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देतात आणि त्यानंतरच कॉल्स उचलतात. त्यांनी मला एकदा सांगितले होते की, त्या रात्री झोपायला जाण्यापूर्वी किमान एक तास फोनला दूर ठेवत पुस्तक वाचण्याला प्राधान्य देतात. त्यांच्या याच सवयीने मला प्रेरित केले.’’

एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्तव म्हणाल्या, “सर्वांना माहितच आहे की ‘भाबीजी घर पर है’ ही माझी पहिलीच विनोदी मालिका आहे आणि मी अनिता भाभीची भूमिका साकारण्यासाठी खूपच नर्व्हस होते. माझ्या सह-कलाकारांनी मला कम्फर्टेबल वाटण्यास, प्रेक्षकांना हसवण्यास आणि माझी विनोदी शैली वापरण्यासोबत अधिक निपुण करण्यास मदत केली. ज्यामुळे माझ्या सह-कलाकारांपैकी कोणा एकाचेच नाव सांगणे माझ्यासाठी अशक्य आहे. सेटवरील प्रत्येकजण मला विनोदी व उत्स्फूर्त होण्यास प्रेरित करतात. आसिफ जी (विभुती नारायण मिश्रा) असोत किंवा वैभव माथूर (टिका) असो आम्ही तालीम करत असताना संपूर्ण सेट हास्य व आनंदाने भरून जातो. या काही महिन्यांमध्ये माझ्या सह-कलाकारांकडून मी अवलंबलेली सर्वात बहुमूल्य सवय म्हणजे धमाल, विनोदी, आनंदी व सहाय्यक असणे.’’

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande