अमरावती : वीज चोरांकडून ३८ लाखांचा दंड वसूल
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) :अमरावती महावितरण वरूड उपविभागीय कार्यालयाकडून वरूड शहरासह परिसरातील
अमरावती : वीज चोरांकडून ३८ लाखांचा दंड वसूल


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) :अमरावती महावितरण वरूड उपविभागीय कार्यालयाकडून वरूड शहरासह परिसरातील ९६ ग्राहकांकडे मागील सहा महिन्यात पकडलेल्या वीज चोरीची दंडासहीत ३८ लाख ७९ हजार रूपये वसुल करण्यात आले आहे. शिवाय महावितरण मोर्शी विभागातर्फे वीज चोरी विरोधातली मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोर्शी राजेंद्र मळसणे यांनी दिली आहे.

वरूड उपविभाग १ चे उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या पथकाच्या धाडसत्रात वरूड शहर,राजुरा बाजार, गडेगांव, आमनेर, घोरड, पोरगवान, एकदरा, मोरचुंद, चिंचरगवान,हतूर्णा,वांडली वाडेगाव वाठोडा, सावंगी येथे जुन २०२२ पासुन एकून ९६ वीज चोरीच्या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये ४ लाख ९७ हजार युनिटची वीज चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ३८ लाख ७९ हजार रूपयाची आकारण्यात आलेली वीज चोरी व दंड रक्कम या ग्राहकांकडून भरून घेण्यात आली आहे.कलर बॉक्सवीज चोरीचे विविध प्रकार वीज चोरी विविध प्रकारे करण्यात येत असली तरी महावितरणने वीज चोरीच्या सर्व क्लुप्त्यांवर आपला फास मजबूत केला आहे..वरूड उपविभाग एक च्या परिसरात करण्यात आलेल्या ९६ वीज चोऱ्यापैकी ३२ ग्राहकांकडून वीज मीटरला मागच्या बाजूने छिद्र पाडत सीटीचा वायर कट करण्यात आला होता. १७ ग्राहकांनी सर्वीस वायरला टॅप करून फेज आणि न्युट्रल बाय पास केले होते. २९ ग्राहकांनी बटनचा वापर करून न्युट्रल बायपास सोबत थ्री पीनचा वापर केला होता,तर १९ ग्राहकांनी घरगुतीच्या नावावर वाणिज्यिक वापर करत असल्याचे समोर आले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande