अमरावती : गडगा सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामधल्या ४९४ कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्प
 गडगा सिंचन प्रकल्प


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामधल्या ४९४ कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून चार हजार पाचशे हेक्टर क्षेत्रातील ओलितासाठी आदिवासींसह गैरआदिवासी शेतकऱ्यांसाठी वर्षातील २ पिके घेण्यासाठी हा प्रकल्प नवसंजीवनी ठरणार आहे. मुंबईतील नामांकित एफ.ए. खत्री यांच्या कन्ट्रक्शन कंपनीच्या मार्गदर्शनाखालीमान्सुधावडी येथे निर्माणाधिन

गडगा सिंचन प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम धारणी तालुक्यातील पूर्ण झाले असून उर्वरित धरणातील मुख्यद्वारचे कामसंपल्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ मिळणार आहे. गडगा सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील जवळपास ३० ते ४० आदिवासी गावांतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकरी रब्बीसह उन्हाळी पिकेसुद्धा घेणार आहे. सिंचन क्षमता वाढल्याने पर्यावरणालासुद्धा फायदा होऊन पक्षाचे स्थलांतर होईल आणि येणाऱ्या काळात गडगा सिंचन प्रकल्प पर्यटकांसाठीसुद्धा आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.

यासंदर्भात मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र आडे म्हणाले की, गडगा सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झाल्यानंतर चार हजार पाचशे हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande