हवाई दलाच्या आग्रा तळावर समन्वय- 2022 संयुक्त सरावाचे आयोजन
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय हवाई दल 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधी
हवाई दलाच्या आग्रा तळावर समन्वय- 2022 संयुक्त सरावाचे आयोजन


नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय हवाई दल 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आग्रा इथल्या हवाई तळावर वार्षिक एचएडीआर अर्थात संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्कालीन मदत 'समन्वय 2022' आयोजित करत आहे. संस्थात्मक आपत्ती व्यवस्थापन संरचना आणि आकस्मिक उपायांच्या अचूक परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने या सरावाचे आय़ोजन करण्यात येणार आहे. या सरावामध्ये आपत्ती व्यवस्थापनावरील परिसंवाद, मानवतावादी सहाय्य आणि आपत्कालीन मदतीशी संबंधित बाबींचे प्रदर्शन, हवाई कसरती यांचा समावेश असून हा सराव बहुसंस्थात्मक असेल.

या क्षेत्राशी संबंधीत देशातील विविध संस्थांच्या सहभागासोबतच या सरावात आसियान देशांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 29 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजित क्षमता प्रात्यक्षिक कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

समन्वय 2022 सराव, नागरी प्रशासन, सशस्त्र दले, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, सीमा रस्ते संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग, एनआरएस आणि भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती केंद्र यासह आपत्ती व्यवस्थापनात असलेल्या विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना यांच्याकडून केल्या जाणाऱ्या मानवतावादी साहाय्य आणि आकस्मिक मदत याबाबत समन्वयवादी दृष्टिकोनाला चालना देईल. प्रभावी संवाद, आंतरकार्यक्षमता, सहकार्य आणि मानवतावादी साहाय्य व आपत्कालीन मदत यशस्वी करण्यातले त्यांचे उपयोजन यासाठी संस्थात्मक आराखडा तयार करण्यात योगदान, या बहुसंस्थात्मक सरावातून अपेक्षित आहे. त्याचबरोबर सहभागी आसियान सदस्य देशांसोबत या क्षेत्रातील ज्ञानाचे तसेच अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची आदानप्रदान करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande