सोलापूर : विवाहितेला पैशाचा तगादा; मुस्लिम महिला कायद्यान्वये सासरच्या तिंघावर गुन्हा
सोलापूर 24 नोव्हेंबर (हिं.स) :विवाहितेला पैशाचा तगादा लावण्यात आला, नंतर केस कापले, शारीरिक व मानसिक
सोलापूर : विवाहितेला पैशाचा तगादा; मुस्लिम महिला कायद्यान्वये सासरच्या तिंघावर गुन्हा


सोलापूर 24 नोव्हेंबर (हिं.स) :विवाहितेला पैशाचा तगादा लावण्यात आला, नंतर केस कापले, शारीरिक व मानसिक छळ करून तलाख देण्यात आल्याची फिर्याद सुमैय्या चौधरी यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुमैय्या कलिम चौधरी (वय २०, रा. राजेंद्र चौक) यांनी फिर्याद दिली आहे. कलिम सत्तार चौधरी, रजिया चौधरी, सत्तार चौधरी, यांच्यावर विविध कलमांसह मुस्लिम महिला संरक्षण कायद्याप्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमैय्याकडे सासरच्या मंडळींनी माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. नंतर केस कापले आणि शारीरिक व मानसिक छळ केला. एवढ्यावर न थांबता पतीने तलाक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सखोल माहिती मिळवण्यासाठी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून माहिती घेतली जात आहे. तसेच, संबंधित प्रकरणातील पुरावे गोळा केले जात असल्याची माहिती तपास अधिकारी नरसप्पा राठोड यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande